मुख्य नियम
मंजूर झालेला refund फक्त retailer च्या portal wallet मध्ये जमा होतो, 7 दिवसांच्या आत. Bank खात्यात, UPI वर, card वर किंवा रोख स्वरूपात refund दिला जात नाही.
1. आम्ही वस्तू विकत नाही
आम्ही फक्त सेवा देतो: retailer ने upload केलेल्या कागदपत्रांवरून आमचे operator मूळ काम करतात आणि तयार प्रमाणपत्र / अर्ज / कागद portal वर upload करतात. कोणतीही वस्तू पाठवली जात नाही, म्हणून "Return" किंवा "Shipping" लागू होत नाही. आमचा portal कोणताही सरकारी दाखला स्वतः बनवत नाही.
2. केव्हा refund मिळतो
| परिस्थिती | Refund (फक्त wallet मध्ये) |
|---|---|
| Operator ने काम सुरू करण्याआधी अर्ज रद्द केला | पूर्ण सेवा शुल्क |
| आमच्या चुकीमुळे काम होऊ शकले नाही | पूर्ण सेवा शुल्क |
| Wallet मधून पैसे कापले गेले पण अर्ज तयार झाला नाही (तांत्रिक अडचण) | पूर्ण रक्कम – आपोआप किंवा तपासणीनंतर |
| Operator ने काम सुरू केले / सरकारी portal वर अर्ज सादर झाला | Refund नाही – काम झाले आहे |
| काम पूर्ण होऊन प्रमाणपत्र / कागद upload झाले | Refund नाही |
| सरकारी विभागाने अर्ज नाकारला किंवा उशीर केला | Refund नाही (मंजुरी सरकारच्या अधिकारात) |
| Retailer ने त्रुटी (query) वेळेत पूर्ण केली नाही / चुकीचे कागद दिले | Refund नाही |
| भरलेली सरकारी फी / चलन | सरकारच्या नियमानुसार; आमच्याकडून परत होत नाही |
| PAN / वाहन / शेतकरी इ. माहिती तपासणी (API) यशस्वी झाल्यानंतर | Refund नाही; अयशस्वी झाल्यास पैसे आपोआप wallet मध्ये परत |
| Retailer ID फी, My Shop वार्षिक plan | सुरू झाल्यानंतर refund नाही |
3. Wallet चे नियम
- Wallet मधील पैसे फक्त portal वरील सेवांसाठी वापरायचे आहेत; ते bank खाते नाही आणि त्यावर व्याज मिळत नाही.
- Wallet मध्ये जमा केलेली किंवा refund झालेली रक्कम bank खात्यात परत काढता येत नाही – ती पुढच्या सेवांसाठी वापरता येते.
- Distributor / Master Distributor चे commission हे वेगळे आहे – त्याचे withdrawal admin मंजुरीनंतर bank खात्यात जाते.
4. Refund कसा व कधी
- Refund ची विनंती काम रद्द झाल्यापासून 7 दिवसांच्या आत तक्रार निवारण पानावरून करा (अर्ज / Order क्रमांक लिहा).
- तपासणीनंतर मंजूर झालेला refund 7 दिवसांच्या आत retailer च्या portal wallet मध्ये जमा होतो आणि wallet history मध्ये दिसतो.
- Refund फक्त ज्या retailer च्या wallet मधून पैसे कापले त्याच wallet मध्ये होतो.